गायी पुजावया निधाला पुजारी । घेऊनिया झारी फुलांचिये
गायी पुजावया निधाला पुजारी ।
घेऊनिया झारी फुलांचिये ॥धृ॥
गंध पुष्प वाहे माळ घाली गळा ।
नैवेद्याचा चाळा नाकी लावी ॥1॥
हांकुनिया देई गाय पुजूनिया ।
म्हणे लोकांसी या पूजा केली ॥2॥
तुकड्यादास म्हणे वारे ! हा पुजारी।
चार्यावीण करी गऊ-भक्ति ॥3॥