तुळसीची माळ गळा घालुनिया

तुळसीची माळ  गळा घालुनिया । 
दुःखवी जना या पैशासाठी ॥धृ॥
कापोनिया मान दुःखिया लोकांची। 
सेवा विठोबाची हौसे करी ॥1॥
वारे ! हा पुजारी कसाई अवतार । 
घाली देवावर भार साचा ॥2॥
तुकड्यादास म्हणे देव नाही सान । 
माळेने भोंदून मोक्ष देई ॥3॥