गेले ते दिवस डोळे मिटायाचे ।
गेले ते दिवस डोळे मिटायाचे ।
आता या अंगाचे थाट होती ॥धृ॥
परधर्मियांची पडेल साखळी ।
चुके वनमाळी एकाएकी ॥1॥
नाही तरी जागे करा सर्व लोक ।
उठवा निःशंक धर्मासाठी ॥2॥
तुकड्यादास म्हणे वाट पाहे प्राण ।
करितो रक्षण कोण माझे ॥3॥