राम रंगवा अंतरीं । विषय काढावे बाहेरी

राम रंगवा अंतरीं । 
विषय काढावे बाहेरी ॥धृ॥
कामा मूठमाती द्यावी । 
मैत्री विवेका लावावी ॥1॥
रंजल्याचे साथी व्हावे । 
सत्य समजी वागावे ॥2॥
तुकड्या म्हणे तोचि भक्त । 
शिश्नोदरी जो विरक्त ॥3॥