रंजले गांजले म्हणावे आपुले ।
रंजले गांजले म्हणावे आपुले ।
संते बोलियले जनी वनी ॥धृ॥
आजिचा दिवस विचित्रचि आला ।
भाविक नाडला भोळेपणी ॥1॥
भिकाच्याचे बळे करुनिया सोंग ।
करिती उद्योग नट जैसे ॥2॥
तुकड्यादास म्हणे भिकाऱ्याच्या लेका । ओकाऱ्याच्या धाका नेघो आम्ही ॥3॥