दाने घड़े पाप दाने पुण्य होई ।

दाने घड़े पाप दाने पुण्य होई । 
दाने गोत्र जाई स्वर्गामाजी ॥धृ॥
दानानें उद्धार दानानें भिकार । 
वाढे राष्ट्री फार स्वानुभवे ।।1॥
कोणा काय द्यावे ? कळावे हे आधी । 
दाने पुण्ये तधी लाभतील ॥2॥
तुकड्यादास म्हणे आम्ही द्यावे दान । 
करिती मद्यपान भिकारी हे ॥3॥