आम्ही पुण्य केले लोकां पाप झाले ।

आम्ही पुण्य केले लोकां पाप झाले । 
ऐसेचि हे आले अज्ञानाने ॥धृ॥
नका देऊ तरी व्यसने सांडती । 
देता अधोगति दोघांनाही ॥1॥
याचि कारणासी विचार पाहिजे ।
काय केव्हां कीजे दान धर्म ॥2॥
तुकडयादास म्हणे पुण्य करिता पाप । 
घडलिया ताप वाटे देहा ॥3॥