सुपात्रीच दान द्यारे संत बोले ।

सुपात्रीच दान द्यारे संत बोले । 
अर्थ बोधियेले नाही आम्हा ॥धृ॥
कोणते सुपात्र पहावे ये काळी ? । 
द्रव्याचिये मेळी भिके सारे ॥1॥
सुपात्राचे वर्म जाणती निष्काम । 
येरांसी विश्राम कैसा तेथे ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे निष्काम व्हा आधी। 
स्वार्थे नर कधी काटे खाय ॥3॥