संसारावी हाव घरुनिया चित्ती ।
संसारावी हाव घरुनिया चित्ती ।
कापुराची वाती लावी घरी ॥धृ॥
हात जोडूनिया मागे देवा धन ।
जरा नाही मन देवापाशी ॥1॥
नाक घासोनिया मागतो संतान ।
देईन दावण म्हणे देवा ॥2॥
तुकडयादास म्हणे ऐसे जे कां जन ।
पाहे नारायण दुरुनी तयां ॥3॥