चाखावया रुचि आपुल्या जिव्हेने । म्हणे म्हसोबाने स्वप्न दिले

चाखावया रुचि आपुल्या जिव्हेने । 
म्हणे म्हसोबाने स्वप्न दिले ॥धृ॥
बाई ! एक द्यावा बकरा आणून । 
त्वरीत संतान होय तुम्हां ॥1॥
राक्षसीण बाई करी ना विचार । 
मेंढ्या दोन चार देई देवा ॥2॥
तुकडयादास म्हणे पावेना तो देव । 
तरी मांडे खेव देवापाशी ॥3॥