तुमचिया पुत्रा वधू देता काय ?। तेणे दुःख होय वाटे, का हे
तुमचिया पुत्रा वधू देता काय ?।
तेणे दुःख होय वाटे, का हे ? ॥धृ॥
दुजियाच्या वत्सा कापता धावोनी ।
कैसे नारायणी सहन होय ? ॥1॥
देवे जन्म दिला कासयाकारण ? ।
वधावया दीन जीव लोकां ? ॥2॥
तुकडयादास म्हणे भूते लागतील ।
जरा ना सोडील अंतकाळी ॥3॥