जीवदया ठेवा तरी आहे बरे ।
जीवदया ठेवा तरी आहे बरे ।
नाही तरी बोरे उड़तील ॥धृ॥
करावे ते आता भोगावे मागुता ।
ऐसी आहे कथा वडीलांची ॥1॥
मारावे मरावे शुराचिया सवे ।
तेणे मुक्ति पावे समरांगणी ।।2॥
तुकडयादास म्हणे गावकरी वधी ।
देव पाहे संधी पापीयांची ॥3॥