गायीचिया पुण्ये खाया अन्न भेटे ।
गायीचिया पुण्ये खाया अन्न भेटे ।
नाहीतरी बेटे काय खाती ? ॥धृ॥
माणसे ओढती काय नांगरासी? ।
काय छाती त्यांची कामकरी ? ॥1॥
सुखाववा गायी देवाने निर्मिल्या ।
कापावया दिल्या काय यांना ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे भोगतील अंती ।
कळेल पुढती वर्म याचे ॥3॥