हिंदु म्हणविता लाज नाही चित्ता । गायीसी विकता लपोनिया

हिंदु म्हणविता लाज नाही चित्ता । 
गायीसी विकता लपोनिया ॥धृ॥
कांही दुष्ट आम्ही पाहिले नेत्राने । 
गो-मांस हिंदुने भक्षियले ॥1॥
कैसा देव तया कीर्तिवंत म्हणे ? । 
भोगता पतने राहतील ॥2॥
तुकड्यादास म्हणे धर्म हा बुडाला । 
सुधारचि झाला दुःखरूप ॥3॥