आहे हिंदुंचे सणवार । सर्व खाण्याचा बाजार

आहे हिंदुंचे सणवार । 
सर्व खाण्याचा बाजार ॥
तत्व गेले संतांसवे । 
आहे पोटाचे गोडवे ॥
अंगी भित्रेपणा आला । 
हाचि सुधार संचला ।॥
तुकड्यादास म्हणे नावा । 
हिंदपुत्रे दिला दिवा ॥