जन्म मृत्युद्धिन यासचि पुजती । सर्वकाळ स्मृति होत राहो

जन्म मृत्युद्धिन यासचि पुजती । 
सर्वकाळ स्मृति होत राहो ॥धृ॥
थोरांचे चरित्र रहावे सामोरी । 
तेणे व्याने करी सर्व लोक ॥1॥
कीर्तिवंत जनी कीर्ति करुनी गेले । 
आम्हासी हे दिले धड़े त्यांनी ॥2॥
तुकडयादास म्हणे वागावयासाठी 
पाडल्या परिपाठी व्यवहारी या ॥3॥