संत-अवतार होती याचसाठी
संत-अवतार होती याचसाठी ।
अंधारी दिवटी दावावया ॥धृ॥
भूलले हे जन मायेच्या झांपडी ।
तयांतुनी काढी संत बोधे ॥1॥
दाखविती मार्ग आत्म-स्वरूपाचा
भेद जिवशिवाचा मिटावया ।।2॥
तुकङ्यादास म्हणे तयांचा स्वभाव ।
दुजियासी ठाव दावो लागे ॥3॥