साधुसंत माय बाप या देहाचे

साधुसंत माय बाप या देहाचे । 
अनंत जन्माचे साधिदार ।।धृ॥
उपजवी भक्ति-बीज अंगांतुनी । 
वाढवी देखणी आपुलिये ।।1॥
बोधरूप खता देउनी पुष्टवी। 
वृक्ष हा वाढवी जन्मोजन्मी ॥2॥
तुकडयादास म्हणे पक्ककरी ज्ञाने । 
फेडाया पारणे जन्मयात्रा ॥3॥