आचरुनी जाती थोर परलोकी । कीर्ति अलौकिक करोनिया

आचरुनी जाती थोर परलोकी । 
कीर्ति अलौकिक करोनिया ॥धृ॥
तयांची चरित्रे दाविती बोध ! 
कळावया शुद्ध मार्ग जना ।।1॥
वाचोनी नकळे ते हे डोळा दिसे ।
वर्म अनायासे ज्ञानियांचे ॥2॥
तुकड्यादास म्हणे पहा इतिहासर। 
स्वामी रामदास कैसे झाले ? ।।3॥