थोरांचे चरित्र भाविका पुराण ।

थोरांचे चरित्र भाविका पुराण । 
तेणे होय मन सावशुद्ध ॥धृ॥
तेणे वाढे प्रेम साथका-अंतरी । 
करावया पुरी जन्मयात्रा ॥1॥
श्रेष्ठ जयामार्गे निर्भयत्वे जाती । 
तेचि कृत्य घेती मनी सर्व ॥2॥
तुकड्यादास म्हणे चरित्र वाचावे । 
वाचोनी वागावे तैशापरी ॥3॥