तुटक्याशा झोपडी प्रभुचे ये नाम
तुटक्याशा झोपडी प्रभुचे ये नाम ।
तेचि निजधाम आम्हालागी ॥धृ॥
रंगमहाली जरी निंदाराज्य चाले ।
नर्कासम झाले घर आम्हा ॥1॥
पागलासी जरी कळे प्रभुनाम ।
तोचि अमुचे प्रेम निर्मळत्वे ॥2॥
थोराचिया मुखी झूट जरी आहे ।
राक्षसचि पाहे त्याला मन ॥3॥
तुकडयादास म्हणे बाहेरील सोंग ।
माझा पांडुरंग जाणतसे ॥4॥