तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सर्व सत्ते देवाचिये । आम्ही झालो जी ! निर्भय
सर्व सत्ते देवाचिये ।
आम्ही झालो जी ! निर्भय ॥धृ॥
तयाबीण नोहे कांहीं ।
जळो अहंकार सर्वही ॥1॥
मना तोवि देई शांति ।
नाहीतरी घडे क्रांति ॥2॥
तुकड्यादास म्हणे पहा ।
शोध लावोनिया रहा ॥3॥