जग आम्ही ओळखिले । ते तो भोळिया लागले

जग आम्ही ओळखिले । 
ते तो भोळिया लागले ॥धृ॥
जो कां आसक्ती बांधला । 
तोचि जगी गुंडाळला ॥1॥
जया वासनेची चाड । 
जग येई त्याच्या आड ॥2॥
तुकड्या म्हणे मी नि:संग 
जग माझा खेळ रंग ॥3॥