जन्म मरणाची भीति कासयासी

जन्म मरणाची भीति कासयासी । 
सर्वस्वि  देवासी वाहिलिया ? ॥धृ॥
दळे तो सावडे म्हण आहे ऐसी। 
आम्हा भीति कैसी लागे आता ? ॥1॥
लाभ हानि सर्व देव पहातील । 
चिंता बिलकूल नाही आम्हा ॥2॥
तुकडयादास म्हणे हा माझा विश्रास । 
सर्व पुरवी आस देवराव ॥3॥