आपुलेसे जरा राहू नका कोणी

आपुलेसे जरा राहू नका कोणी । 
अर्पावा चरणी जीव भाव ॥धृ॥
निश्चिय मानसी चुको देऊ नये । 
रहावे निर्भय पांडुरंगी ॥1॥
सुख दुःख भोग समर्पावा पायी । 
हानि लाभ काही घेऊ नये ॥2॥
तुकडयादास म्हणे ऐसे जो करील । 
आनंदे भरील तिन्ही लोक ॥3॥