आमुच्या देखता गरिबांची पोरे । झाली पदविधरे रावराजे ॥

आमुच्या देखता गरिबांची पोरे । 
झाली पदविधरे रावराजे ॥धृ॥
लहानपणी नाही खाया मिळे अन्र । 
आता शिराहुन छत्र फिरे ॥1॥
देवाची करणी पुरषाचे भाग्य । 
उगवे सदभाग्य कोण जाणे ?॥2॥
तुकडयादास म्हणे मोठियांची पोरे । 
फिरती भिकारे भाग्यहीन ॥3॥