गरिबा हासतां बहू सुख वाटे ।

गरिबा हासतां बहू सुख वाटे । 
शिव्याचे सपाटे दारिद्र्यासी ॥धृ॥
देवा हे खपेना पाहतो तो सर्व । 
क्षणी हरे गर्व श्रीमंताचा ॥1॥
लागतसे आग जळे मालमत्ता ।
आपत्ति साहता कष्ट लागे ॥2॥
तुकड्यादास म्हणे भुलले श्रीमंती ।
विसराल अंती खाणे पिणे ॥3॥