आपुला आपण राहे शत्रु मित्र

आपुला आपण राहे शत्रु मित्र ।
कारण सर्वत्र हाचि जीव ॥धृ॥
आपण लोकांशी लोक आपणाशी । 
आचरू जे जैसी कृत्ये होती ॥1॥
आपुलाचि घात होय आपणाने । 
भासते जगाने केले ऐसे ॥2॥
तुकड्यादास म्हणे आपुला उद्धार ।
करा भक्तिसार काढोनिया ॥3॥