वनवासी म्हणविणार्या !
(चाल: वनवासी राम माझा..)
वनवासी म्हणविणाऱ्या ! कोणी धाडिले तुला ? ॥धृ०॥
भक्त - काज पुरवायासी, धावूनिया गेला ।।१।।
भिल्लिणिची बोरे खासी, शांतविण्या तिजला ।।२॥
राजऋषी भेटी द्याया, असुर वधायाला ॥३॥
शिला अहिल्येची बघुनी, उठविण्या तियेला ।।४॥
शांतविण्या तुकड्यादासा, वेळ काय केला ? ॥५॥