हो शूर, रणीं महशूर, करी तकरार

(चाल: रे, नरा ! आत बघ ज
हो शूर, रणीं महशूर, करी तकरार ।
घे हाति गड्या रे। बैरागी- तलवार ॥धृ०।।
ते काळ पाच फाकडे, धरूनि वाकडे, तुडवि सामोरी ।
मग न ये पुन्हा रे ! यमराजाची स्वारी ।।
प्रवृत्ति काढि बाहेर, होइ महशूर, निवृत्तीसाठी ।
ते सहा काळ रे ! करितिल अडवी मोठी ॥
अति घोर करी ती आई, चुकवुनी जाई, माया नार ।। घे हाति॥१l।
वासना बहुत लालचे, तोंड धर हिचे, टाक रगडोनी ।
कर पुढे विवेका, नरा ! श्रवण देवोनी ।।
कल्पना, द्वेत-भावना, देइ ठाव ना, त्याग कर साचा ।
रे ! भजन करी श्रीहरिचे फोड़नि वाचा ।
ते वेद ठेवुनी दुरी, जाई मग वरी, वाट तुर्येची ।
जळतसे काळ ना वेळ धुनी उन्मनिची ।।
वा ! असो नीच की उंच, सान वा थोर ।। घे हाति0 ॥२|।
तव तुझे स्वरुप पहावया, लागली मया,नाद घुमघुमित ।
रे ! मृदंग,  वीणा, शंख घोर दुमदुमित ।
फाकले गगन सावळे, स्वरुप आगळे, निजानंदाचे ।
हो निजात्मसाक्षात्कारी स्वरुपी नाचे ।।
ते द्वैत टाकुनी दुरी, अखंडित धरी, महावाक्यास ।
ना उरी असे रे ! तिथे तुला वदण्यास ।।
तुकड्या बालक नरा, होत सोयरा, फिरुनिया फेर ।। घे हाति0 ॥३॥