कृपेचे ज्ञानांजन भरवा
(चाल: राग- जीवनपुरी..)
कृपेचे ज्ञानांजन भरवा l।धृ०।।
मिथ्या संसारातुनि स्वामिन् ! मन-बुध्दी फिरवा l।१॥
अहंकार, भवभेदा निरसुनि, अभेद मन करवा ।।२॥
सचित- आनंदित सुख तुमचे, बुद्धि-पटी झरवा ॥३॥
निजपदा पहाया चित्त सदा हे, पाहतापणि उरवा ।।४॥
तुकड्यादासा पूर्ण कृपेची, कफनी पांघरवा ॥५॥