(अरे हरी !) स्वस्थ का उगा ?
(चाल: अरे ! हरी पाहिले स्वप्न..)
(अरे हरी !) स्वस्थ का उगा ? उगा, धाव वेगे ।
काळ येउनी उरी लागे ।। स्वस्थ काo ॥धृ०।।
वेळ पातली, न पाहवे डोळा, न कर्णी ऐकू ये चाळा ।
जीभ बोबडी, शब्द गुंग झाले,कंठ खरखरा स्वरी चाले ।
कफाची हली, वपू-रोग जडले, धेर्य है देहातुनि गळले ।
स्मरण राहिना, वृत्ति क्षणि भंगे । काळ ये०।।१।।
वेळ ही अशी, न्यावया उभी झाली, वासना पुनर्जन्म व्याली ।
वाटते असे, असे सांगवेना, संशय होति उभे नाना ।
गती कोणती, होईल या प्राणा ? परी भरवसा तुझा सजना ! ।
पुरा वाटतो, काळ कंठवेना, ऐक बा ! दीनाची करुणा ।
काय पाहतो ? घे करुणा वेगे ।। काळ ये0।।२।।
ब्रीद हे तुझे, तुझे सांगवेना, धावसी भक्तांच्या कामा ।
ऐकली स्तुती, स्तुती भक्तवाणी, ब्रीद रक्षितो चक्रपाणी ।
अभागी पुरा, न धावसी म्हणुनी, ऐक बा ! शब्द तरी कर्णीं ।
चित्रपट उभे, काळाचे झाले, बंद इंद्रिये श्वास डोले ।
उसळतो वरी, वरी प्राण जागे ।। काळ ये 0।।३|।
किती पाहसी, पाहसी वेळ करुनी ? कि नेईल काळ असा धरुनी ?
कोण आडवे, येईल मग स्मरणी ? न्यावया पदपंकज भुवनी ?
तुझ्या श्रीहरी, श्रीहरी! सांग वेगे, दास तुकड्या चरणी लागे । स्वस्थ का उगा ।।काळ ये0।।४।।