वंदन सतत मुकुंद-पदाला

(चालः गावो रिधसिध मंगल..)
वंदन सतत मुकुंद-पदाला, दीनदयाळा, परम कृपाळा ॥धृ०॥
आदि, अनादि सतत भरला जो, सदय हृदय मनि ध्याउ तयाला ।।१।।
सतचीत सुखमय रुप जयाचे, साक्षि सदा अविचल घननीळा ॥२॥
नित्य निरंजन भव-भंजन जो, योगि रमण मुनिजन-प्रतिपाला ॥३॥
तुकड्यादास उदास जगी या, गाइन गोड  तुझी  गुणमाला ।।४॥