आवडिचा घनश्याम अम्हाला
(चाल: गावो रिधसिध मंगल..)
आवडिचा घनश्याम अम्हाला, योगिजनांचा जो मतवाला ।।धृ०॥
न्योछावर ही तनु त्यावरुनी, दावु नये कधिही विरहाला ।।१।।
दूर दिसो परि चित्ति असो मम,जेसा बालक प्रिय मातेला ।।२।l
जणु ताऱ्यांना चंद्र एकसा, तैसा प्रभु गमतो हृदयाला ॥३॥
जणु अंबर-जलि-चातक-ओढा, तैसे दे प्रभु प्रेम मनाला ।।४॥
सोडुन न यासी, जीव-जिवासी, तुकड्यादास म्हणे उरि रमला ।।५।l