आकळावा प्रेम-भावे, श्रीहरी अपुल्या मनी

(चाल: ठेविले पाऊल दारी..)
आकळावा प्रेम-भावे, श्रीहरी अपुल्या मनी ।lधृ०।।
याविणे ना अन्य साधन, साधते बहुता जना ।
संत-सज्जन बोलती, भक्ती हवी   हृदयातुनी ॥१॥
ना हवे माळा - टिळे, कधि दंडणे वा मुंडणे ।
शुध्द करुनी वासना, पहावा सखा मग लोचनी ।।२।।
भूषणे किति घातली, भस्मे नि कौपिन दंड रे !
शांति ना मिळते तया, फिरला जरी रानी   वनी ॥३॥
भाकिता करुणा तया, निष्काम होउनि अंतरी ।
धाव घे प्रभु आमुचा, घ्या साक्ष संतांची   कुणी ।।४।।
दास तुकड्या सांगतो, हृदयी विचारा आपुल्या ।
किति गोड आहे तो प्रभृ, पहा विषय बाजू सारुनी ।I५l।