हरी माझा, हरी माझा
(चाल: अगर है ग्यान को पाना..)
हरी माझा, हरी माझा, म्हणे भक्तांचि ही वाणी ।
कुठे लपला अता तो हो ? मला द्या आज दावोनी।।धृ० ।।
श्रृती नेती म्हणे त्याला, कसा भक्तास वश झाला ?
तजू का आज प्राणाला ? मिळेना तो कृपादानी ।।१॥
तया निद्रा असे आली, म्हणुनि ना ऐकवी बोली ।
कशाला माय मज व्याली ? पशूसम दे मला गणुनी ।।२ ।।
मला देवोनि नर-काया, अता देशी कि नरका या ?
ही योनि व्यर्थ नच जाया,तो तुकड्यादास तुज मानी ॥३॥