जागुनि काय मिळे रसनेला ?

(चालः अब में अपने प्रभु...)
जागुनि काय मिळे रसनेला ? ॥धृ०।।
झिलमिल झिलमिल टपकत पाणी, लाजवि स्वर्ग-सुधेला ॥१॥
त्रिकुट शिखरि गोल्हाट भुमंडळि, प्रगटे लख  उजियाला ।।२।।
लखलख लखलख चमके   बिजली, वाटे   भानु  उदेला ।।३।।
तुकड्यादास भुले  भव - भय  ते, जागा   असता   मेला ।।४॥