रे गडया ! कसा निजलासी ?

(चालः कुठवरी भोगशिल मोजा... )
रे गडया ! कसा निजलासी ? ती जवळ उभी चोऱ्यांशी रे ! ।।ध्रु।।
यमराजा मग मारिल दंडा, काय सांगशिल त्यासी ?
पुराण, पोथ्या - गाथे सगळे, शोभा लावुनि घेसी रे ! ।।१।।
अंतर - प्रेमा झोपी गेला, शेवटि जाशिल  फारसी ।
नाहक जन्म दिला तुज ऐसा, हानी केली  कैसी  रे ! ।।२।।
जग - जंजाल पाहुनी भुलला, सूकरवत् मग होशी ।
हो जागा अरुनिया वेळ ती, आलि  घराचे  पाशी  रे ! ||३।।
तुकड्यादास म्हणे समजी गुज, नातरि वाया जाशी ।
उधड नेत्र, जा सद्गुरु - पायी, होइल मुक्त जिवासी रे ! ।|४॥