का उगा स्वस्थ बसलासी ?

(चाल: कुठवरी भोगशिल मोजा...)
का उगा स्वस्थ बसलासी ? जा शरण गुरुचे पाया रे ! I|धृo|।
चाखुनि विषय-सुखाची   गोडी, वय   हे   गेले  वाया ।
काम, क्रोध, मद-मत्सर जमले, आले तुज माराया रे ! ।l१।।
धन-दारा-सुत-बांधव सारे, आले तुज लुटवाया l
जन हे स्वार्थ साधुनी घेती, फिरसि भीक मागाया रे ! ॥२॥
जन्मापासुनि आजवरीही, न दिसे सौख्य जिवा या ।
आला तैसा गेला   वाया, व्यर्थ   लाविली   माया  रे ! ॥३॥
सोड अता हे टुर्गुण सारे, जाई   शरणा   यदुराया ।
तुकडयादास म्हणे ही वेळा, न ये कधी  वागाया  रे ! ll४ II