कोठवरी ! रे फिरशि अता हे
(चाल: कसा निभवशी काळ..)
कोठवरी ! रे फिरशि अता हे, रडगाणे धरूनी ?
नच संपे ही अंतर - इच्छा, यम आला बनुनी ।।धृo।।
करिता माझे माझे सर्वहि, जाईल रे ! वाया ।
श्रीगुरु-चरणा धरशिल केव्हा,योनी चुकवाया ? ll१॥
मारुनिया गर्भात उडी, बहू पडला जग-भवरी ।
सोडुनिया निज नाम हरीचे, बनला कुविचारी ।।२॥
क्षणिक सुखाला मानुनि सत्यचि, वय सारे हरले ।
म्हातारपणी आठविताना, खांसित मन गेले ।।३॥
तुकड्यादास सांगतसे गुज, धरी अता सोय ।
गुरु-चरणाविण तुला गड्या ! नच मिळतचि सदुपाय ।।४॥