अशीच हन हन कोठवरी ?
(चाल: कसा निभवशी काळ..)
अशीच हन हन कोठवरी ? बघ, फिरत फिरत आला ।
घेता विषय सुखाची गोडी, शांति न ये तुजला ।।धृ०।।
निर्लजा ! नर - तनू पावुनी, मूर्ख मनी बनला ।
क्षणिक सुखाशी बसतो टपुनी, तिरी जसा बगळा ।।१।।
महा भयंकर काळ उभा तो, बघ त्याला थोडा l
कर्मगती नच आवरली, का बनला निच घोडा ? ।।२।l
व्यसन तुझे हे सुटेल केव्हा ? उमज धरी प्राण्या !
कोठवरी हे रडगाणे रे ? सोड अता शहाण्या ! ll३ll
तुकड्यादास सांगतसे गुज, दे याला धडक ।
हो झटपट सावधान, नातरि जन्माचे खडक ॥४।।