करी काहि साधना गड्या रे !
(चाल: कसा निभवशी काळ..)
करी काहि साधना गड्या रे ! सत्य - सुखासाठी ।
वय हे सुंदर जाइल झटपट, काळ असे पाठी ।।धृo।।
भोगुनिया रे ! विषय -सुखाला, का करिशी उशिर ।
समज धरी, निज-अंतर शोधुन, भज तो रघुवीर ।।१।।
क्षणिक धरुनिया भव हे मागे सोडियले अमर ।
व्यर्थचि जाइल सर्वचि हे बघ, उडता जिव-भ्रमर ।।२ ।।
गणगोतादिक पाहनि सगळे, मानिसि सुख त्यात ।
करिता पैसा पैसा होइल, की त्यातचि अंत ।।३॥
तुकड्यादास सांगतसे गुज, निज-हित घे करुनी ।
संत - समागम तो दुर्लभ रे ! राहि चरण धरुनी ॥४॥