स्वस्थ का बसूनी असा, मायेत प्राणी राहतो ?

(चाल : क्यों नही देते हो दर्शन..)
स्वस्थ का बसूनी असा, मायेत   प्राणी  राहतो ?
की नसे त्याला शरम जी ! मृगजळी तो वाहतो ।।धृo।।
जन्म-मृत्यू तोडण्या, नरदेह    हाची   पातला ।
नर्ककुंडी    घातला,  मग   डास   होउनि   साहतो ।।१।।
सांगती साधू सदा या, तरि न केली शुध्द काया ।
अजब वाटे ! अजुनि माया, का न टाकी मोह तो ? ।।२ ।।
सोडुनिया शाश्वतासी, घेति मननी या भवासी ।
दास   तुकड्या    काननासी,   जावयाला   पाहतो ।।३।।