सुख देइ हरी ! भारत - भू ला

(चालः प्रभू! मंगलमय तव नाम सदा...)
सुख देइ हरी ! भारत - भू ला ।।धृ०।।
कठिण प्रसंग बळे आला हा, ठावे सकलहि हे तुजला ।। १।।
बघ डोळा उघडून जरा तरि, परवश जीव कसा झाला ।।२l।
शुर धुरंधर अतीरथी  जे, काळ   अता   तो  ना  उरला ।।३।।
तुकड्यादास म्हणे तुजवाचुनि,वृक्ष जसा दिसतो सुकला।४।।