झणि भेट सख्या, गुरुराया ! गुरुराया गा !

(चाल : अशि घाल गळा मिठि बाळा...)
झणि भेट सख्या, गुरुराया ! गुरुराया गा ! ।।धृ०।।
तुजवाचुनिया जीव उदासी, ने ओढुनिया माया गा ! ॥१ ||
विषय- विकारे मन घे गोते, स्थीर न राहे काया गा ! ॥२ ।।
सत्संगतिचा लाभ न पावे, जाइल वेळहि वाया गा ! ।।३ ॥
तुकड्यादास म्हणे निववी मज, करुनि कृपा दीना या गा ! ।।४।।