झणि चित्त तुझे गुण गावो, गुण
(चाल : अशि घाल गळा मिठि बाळा..)
झणि चित्त तुझे गुण गावो, गुण गावो गा ! ।।धृ०।।
सगुण रुप तव राहो नेत्री, पन चिन्मय रुप पाहो गा ! ||१ ॥
कीर्ति वदो मम चारहि वाणी, जीव रंगि तव न्हावो गा ! ॥२॥
कर्ण तुझे ऐको लीलामृत, हृदयी बोध समावो गा ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे हाची वर, संत अम्हाला देवो गा ! ।|४ l।