येतो ध्वनि हा कुणाचा ? लावी वेध काननाचा

(चाल : राधे! इतुका कशाला..)
येतो ध्वनि हा कुणाचा ? लावी वेध काननाचा ॥धृo।।
स्वस्थ उभा मी अपुले दारी, कर्ण कसा नादे झणकारी ? ।
ओढी तार या मनाचा ।। लावी0 ।।१।।
नेत्र न पाही नेत्रा अपुल्या, इंद्रियवृत्त्या-उर्ध्वची झाल्या ।
गेला भाव या तनाचा ।। लावी 0।।२।।
दूर दिशेवर तंतू ओढी, वाटे या जिव-भावा सोडी ।
मोडी भेद मी पणाचा ।। लावी0 ll३।।
तुकड्यादास म्हणे भ्रमराने, परिमल ओढावा जिवप्राणे ।
तैसा जीव होत साचा ॥ लावी0।।४।।