कोठे काळ हा निभेना, चित्ता तिळभरी गमेना

(चालः राधे! इतुका कशाला..)
कोठे काळ हा निभेना, चित्ता तिळभरी गमेना ।।धृ०।।
वाटे कोठे निघुनि जावे, विरह-दुःखाचे शोकि झुरावे ।
माझा श्याम का मिळेना ? ।। चित्ता 0ll१।।
सृष्टी मनमोहक जरि असली, मज वाटे ही मजवर रुसली ।
शांति जिवासी दिसेना ।। चित्ता 0।।२।।
पोपट-मैना किति तरि पक्षी, प्रणय-सुखास्तव रमती वृक्षी ।
माझा प्रिय का रमेना ? ।। चित्ता0॥३।।
तुकड्यादास म्हणे जा कोणी, सांगा मम दुःखाची कहाणी ।
वाटे त्यजु काय प्राणा ? ।। चित्ता0।।४।।