सद्गुरुनाथा ! करि करुणा रे
(चालः माया भरल्या या जगती...)
सद्गुरुनाथा ! करि करुणा रे ! चंचल मन घाबरे ।।धृo ।।
स्थीर जरा कधि क्षणहि न राही, मर्कटसम धावरे ।।१।।
कधि वाटे त्या स्मरण करावे, कधि धन- दारा वरे ।।२।।
कधि निर्भय निःसंग विराजे, कधि विषयी हावरे ।।३।।
कधि दान - धर्मादिक साधी, कधि पापी नावरे ।।४।।
तुकड्यादास म्हणे गुरु-भजने, मन होइल बावरे ।।५।l