का अंतरला,का अंतरला ? का अंतरला गुरु-पाया रे !

(चाल: गुरु तुमहि तो हो, गुरु..) 
का अंतरला,का अंतरला ? का अंतरला गुरु-पाया रे ! |।धृo।।
करुणाघन करुणा-सागर तो,करिल कृपा तुज छाया रे ! ।l१।।
नलगे योग जपादिक काही, लीन हो त्याचे   पाया  रे ! ll२।।
नलगे नेम-कर्म-धर्मादिक, अजब   तयाची   माया   रे ! ll३॥
नलगे फूल, फूलांची माळा, अर्पण करि त्या काया रे ! ।।४।।
नलगे धूप-दिपादिक काही, प्रेम धरी   रिझर्वाया   रे ! ।।५।।
नलगे द्रव्य-धनादिक काही,द्वयकर जोड मिळाया रे ! ।।६।।
तुकड्यादास म्हणे जा चरणी,शुध्द करी अधि पाया रे ! ।।७।।